यावलच्या तहसीलदारपदाचा मोहनमाला नाझीरकर यांनी पदभार स्विकारला

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील तहसीलदार याची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या ठिकाणी मोहनमाला नाझीरकर या तहसीलदार आल्या आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या पदाचा पदभार स्विकारला असून विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

 

यावल येथे कार्यरत असलेले तहसीलदार महेश पवार यांची जळगाव येथे बदली झाल्याने यावलच्या तहसीलदार म्हणुन पुणे येथे महसुलमध्ये जमावबंदी विभागात नायब तहसीलदार म्हणुन कार्यरत असलेल्या मोहनमाला नाझीरकर यांनी प्रथमच  पदभार स्विकारला आहे. प्रशासकीय कार्यात गती आणी शिस्त लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगीतले.

 

यावेळी यावल तहसील कार्यालयाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणुक विभागाचे  रशीद तडवी, पुरवठा विभागाच्या तालुका पुरवठा अधिकारी अंकिता वाघमळे, संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार मनोज थारे, पुरवठाचे अव्वल कारकुन वाय डी पाटील , दिपक बाविस्कर यांच्यासह महसुलच्या सर्व विभागातील कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे .

Protected Content