प्रवेशाच्या शेवटच्या दिवशीही जात प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थी संतप्त (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । आज प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस आहे, आणि आम्हाला सहा महिन्यापासून अर्ज करून देखील आजपर्यंत जात प्रमाणपत्र मिळाले नाही. जात प्रमाणपत्र न मिळाल्याने कोणीतीही चूक नसतांना एक शैक्षणिक वर्ष वाया जाईल अशी व्यथा या विद्यार्थ्यांनी मांडली.

जिल्ह्यासह राज्यभरातील विद्यार्थी आज समाज कल्याण कार्यलयात जात प्रमाणपत्र घेण्यासाठी सकाळपासून भलीमोठी रांग लागली आहे.विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतांना जात प्रमाणपत्र सादर केले तर त्यांना त्या प्रवर्गाचा लाभ मिळत असतो. असाच लाभ आपल्याला मिळावा यासाठी विद्यार्थांनी सहा महिन्यापूर्वीच समाज कल्याण विभागात ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे. मात्र, आज त्यांच्या प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस उगवून ही त्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्याने त्यांनी समाज कल्याण कार्यलयात गोंधळ घातला. तर कार्यालयातून प्रक्रिया सुरु आहे, अंतिम सही बाकी आहे असे उत्तर देण्यात येत होते. तर काही प्रकरणात कागदपत्रे देऊन ते सापडत नसल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला.

ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात येईल ऑफलाईन अर्ज करणाऱ्यांना मिळणार नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. अधिकारी, कर्मचारी अरेरावीची भाषा वापरतात असा आरोप विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी केला.

निकिता प्रजापती या विद्यार्थिनीने काल आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज तिच्याशी संवाद साधला असता तिने सांगितले की, आमचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने यांच्यावर केस करू व आमच्या प्रवेशास मुदत वाढ द्यावी अशी मागणी तिने केली. तर सक्षम अधिकारी नसणे, ग्रामपंचायत निवडणूक आदी कारणांमुळे विद्यार्थ्याना जात प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याचे यावेळी समोर आले.

जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष प्रभारी असल्याने ते जळगाव कार्यलयाला वेळ देऊ शकत नाही त्याच बरोबर त्यांच्यावर नंदुरबार येथील सुद्धा प्रभारी भार आहे. त्यामुळे अध्यक्ष येत नसल्याने प्रकरणे अडकून पडली आहे अशी विद्यार्थीनी व्यथा मांडली. जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष प्रभारी असल्याने ते जळगाव कार्यलयात न येता धुळे या आपल्या मूळ नियुतीच्या जिल्ह्यास प्राधान्य देतात असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला.

जात पडताळणी समिती सदस्य वैशाली हिंगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, मी वैद्यकीय रजेवर होते. ११ जानेवारीला मी रुजू झाले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जरी अर्ज केला तरी त्याची हार्ड कॉपी काढून समिती समोर ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. समितीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून आम्ही सकाळी लवकर येऊन रात्री उशिरापर्यंत काम करीत असल्याचे हिंगे यांनी स्पष्ट केले.

मागील चार दिवसापासून समिती अध्यक्ष नंदकुमार बेडसे हे कार्यलयात नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गात प्रवेश मिळत असतांना त्यांना जर जात प्रमाणपत्राअभावी खुल्या प्रवर्गात प्रवेश घ्यावा लागला तर त्यांच्या पालकांवर मोठा आर्थिक बोझा पडणार असल्याचे राष्ट्रवादीचे अॅड. कुणाल पवार यांनी सांगितले. अॅड. पवार यांनी पुढे सांगितले की, त्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संध्याकाळपर्यंत बैठक घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विद्यर्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न बघता शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे अॅड. पवार यांनी सपष्ट केले.

जात पडताळणी समिती अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्याकडे तीन जिल्हायचा पदभार असल्याने ते आज जळगाव कार्यालयात आले नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा आज शेवटचा दिवस असून आज त्यांना प्रमाणपत्र नाही मिळाले त्यांचे भविष्य अंधकारमय होईल असे जितेंद्र बागडे यांनी स्पष्ट केले.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1759266064251626

 

Protected Content