पूजा होमिओपॅथी क्लिनीकतर्फे मोफत औषधी वाटप

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील पूजा होमिओपॅथी क्लिनिक मध्येडॉ.स्वप्नाली पाटील व डॉ.खिलचंद पाटील यांच्या मार्फत आर्सेनिक एल्बम ३० या औषधांचे मोफत

याबाबत वृत्त असे की, होमिओपॅथी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते, या दिशेने संशोधनात्मक प्रवास सुरु झाला आहे. कोरोनावर आजपर्यंत लस, औषधी विकसित होऊ शकलेली नाही. तरीही लक्षणांनुसार उपचार होत असून त्यातून अनेक रुग्ण बरेही होत आहेत. याच आधारे व्यक्ती व त्यातील लक्षणपरत्वे उपचारास प्राधान्य असलेली होमिओपॅथी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते, या दिशेने संशोधनात्मक प्रवास सुरु झाला आहे. या उपचारपद्धतींत अधिक संशोधन व्हावे याकरिता आयुष मंत्रालयानेही मान्यता दिली असल्याने कोरोनाच्या सावटात आता आशेचा किरण दिसू लागला आहे. होमिओपॅथी अशाप्रकारच्या विषाणूजन्य रोगावरील नियंत्रणासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. कोरोना (कोविड-१९) संसर्गावर उपचार करताना नेमकी हीच पद्धती वापरणे योग्य ठरेल.

या उपचार प्रक्रियेत होमिओपॅथीची तीन गोळ्या सलग तीन दिवस दिवसातून एक वेळा देण्यात येतात. यातून कोरोना रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे दिसून येत आहे. या उपचार प्रक्रियेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वापरली जात आहे. या अनुषंगाने फैजपूर शहरातील विद्यानगर येथील पूजा होमिओपॅथी क्लिनिक तर्फे प्रतिबंधात्मक औषधीचे मोफत वाटप करण्यात येत आहे. असाध्य आजारावर पर्याय एकच होमिओपॅथी या तत्वावर आधारित आर्सेनिक एल्बम ३० या औषधाचे कै.डॉ.जयंत प्रमोद बर्‍हाटे यांचे पूजा होमिओपॅथी क्लिनिक तर्फे व डॉ.स्वप्नाली पाटील व डॉ.खिलचंद पाटील यांच्या हस्ते आता पर्यंत ८ हजार ५०० नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले आहे. व घरोघरी जाऊन देण्यात आले आहे.

आर्सेनिक एल्बम मूल द्रव्य हे मेटल ऑईल आहे. जसाकी हा धडधातू ना अधातु , जसा हा कोविड-१९ हा विषाणू ना सजीव नाही निर्जीव, जसे की विषाला विष मारते त्या प्रमाणे होमिओपॅथी मध्ये सुध्दा जर नाकातून तुपासरखा पदार्थ येत असेल तर नाकात तूप टाकायचे आत जाऊन आतील नाजूक त्वचेवर आवरण तयार करते व रोग जंतू पासून बचाव करून सर्दी बारी होते. हेच होमिओपॅथीक मूलतत्त्वे आहेत. डॉ.स्वप्नाली पाटील यांनी कोविड- १९ या आजारापासून संरक्षण होईल व फैजपूर गाव कोरोना मुक्त होईल असी आशा व्यक्त केली आहे. या साठी त्यांना सहाय्यक म्हणून दीपाली बर्‍हाटे, भाग्यश्री भंगाळे, पद्मा भालेराव, शोभा चौधरी, इंदूबाई पाटील, सुनंदा महाजन, हर्षल पाटील, शीतल बोरोले मदत करीत आहे.

पूजा होमिओपॅथी क्लिनीकने लॉकडाऊनच्या आधी नागपूर येथून आर्सेनिक एल्बम ३० औषधी मांगवलेली होती. नंतर भुसावळ व जळगाव येथील होमिओपॅथिक फार्मसी मधून खरेदी करून नागरिकांना मोफत औषधी सेवा सुरू केल्याने नागरिकांनी त्यांना देवदूत म्हटले आहे. हा उपक्रम डॉ. स्वप्नाली पाटील, व डॉ. खिलचंद पाटील या दोन्ही दापात्यांनी हाती घेतलेला आहे. नगरपालिका कर्मचारी, व फैजपूर प्राधाधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्स चे पालन करून नागरिकांना औषधीचे वाटप करीत आहेत. प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले व पालिका प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्याने डॉ पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहे.

Protected Content