डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहात रुग्णांचे हाल

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कोरोना पॉझेटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहात उपचारासाठी आणले जात असून रुग्णांचे हाल होत असून कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने गोळ्याच्या भरोसे उपचार सुरू असल्याची माहिती खुद्द रुग्णांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.पॉझेटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांना भुसावळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात उपचारासाठी आणले जात असून पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३१आहे. तर पॉझेटिव्ह रुग्णांच्या परीवारातील लोकांना केंद्रीय जवाहर विद्यालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आलेले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहामध्ये सायंकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान वृत्त संकलना साठी गेले असता डॉ.जळगावच्या डॉ. प्राजक्ता तळेले मॅडमांची ड्युटी ८.०० वाजेपर्यत असते त्या घरी गेल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली.८:०० वाजेनंतर भुसावळातील डॉ. बडगुजर हे पदभार सांभाळतील अशी माहिती चांगदेवचे आरोग्य सेवक सी.पी. पाटील यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहात नगरसेवक व समाजसेवक यांनी सायंकाळी ६:०० वाजेच्या दरम्यान भेट दिली.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहात दररोज १०० रुग्णांचे स्वब घेतले जात असून या दरम्यान अडचणी येऊ नये म्हणून ८०० मास्क ,७०० हातमोजे, ४८ लहान सॅनिटयझरच्या बाटल्या प्रमोद सावकारे,निर्मल कोठारी,योगेश पाटील, निक्की बतरा यांच्या योगदानाने वाटप करण्यात आले आहे. यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Protected Content