दुकानात गुटख्याची चोरटी विक्री करणाऱ्या एकावर कारवाई: यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंड्स ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल येथील शहरातील ख्वाजा नगरातील रहिवासी असलेला शेख फारूक शेख युसुफ हा विमल गुटख्यासह सुगंधित तंबाखूचा साठा जवळ बाळगत असून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती येथील पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाल्यावरून यावल पोलीस पथकाने छापा मारला असता २९ हजार ५८८ रुपयाचा विमल गुटख्यासह सुगंधित तंबाखू पोलिसांनी जप्त केला असून, शेख फारूक याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत येथील पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना येथील ख्वाजा नगरातील रहिवासी शेख फारुख शेख युसुफ हा इसम स्वतःचे कब्जात मानवी आरोग्यास अपायकारक असलेला विमल गुटखा व सुगंधित तंबाखू स्वत:चे कब्जात बाळगत असून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हेड कॉन्स्टेबल उमेश सानप,पोलीस नाईक वसीम असलम तडवी यांना ख्वाजा नगरातील राहणारा शे. फारूख शे. युसुफ याचे कडे जाऊन खात्री करून कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यावरून पथकाने शे. फारूख त्याचे कडे छापा टाकला असता सुगंधी तंबाखू सह विमल गुटख्याची वीस रुपये किमतीची १५० पाकिटे असा २९ हजार ५८८ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस नाईक वसीम असलम तडवी यांचे फिर्यादी वरून शेख फारुख शेख युसुफ याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनि मोरे हे करीत आहेत.

Protected Content