धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने भारत भर विविध उपक्रम राबविले जात असून जनसामान्य लोकांपर्यंत जागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून पिंप्री खु. येथे तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सावाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा जागृती रॅली शालेय उपक्रमात चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा ,वक्तृत्व ,सैनिक बांधवांचा सत्कार ,आदी उत्साहात सुरू आहेत. याच अनुषंगाने गुरुवार दि ११ ऑगस्ट रोजी पिंप्री खु ता. धरणगाव येथे गावातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंप्री यांचा उस्फुर्त सहभाग होता. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. एम. चौधरी , उपशिक्षक आर. आर. पावरा, एस. के. शिंदे, आर. एस. पाटील , शरीफ पटेल , सचिन पवार, जितेंद्र पाटील , मनीषा पाटील तर माध्यमिक विभागाचे विजय साळवे , भावना भट , दीपिका पाटील, शिक्षकेतर कर्मचारी सौरभ देसले, सुदर्शन चव्हाण, अविनाश पाटील आदी उपस्थित होते. देशाविषयी अभिमान व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.