डॉ. गिरीश चौधरी यांना निलंबित करा: शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी. एम.पाटील यांची मागणी

धरणगाव, प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांच्या दुर्लक्षामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कोविड व्यतिरिक्त रुग्णाचे हाल होत आहेत. याला जबाबदार असणाऱ्याना डॉ. गिरीश चौधरी यांची बदली न करता त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी एम.पाटील यांनी केली आहे.

ओ.पी.डी सकाळी ९ ते १ व सायंकाळी ४ ते ६ अशावेळेत सुरू ठेवण्याची असून वेळेवर डॉक्टर हजर राहत नसल्यामुळे रुग्णाचे हाल होतात. धरणगाव तालुक्यात ७० ते ८० खेडे लागून असल्यामुळे ग्रामीण व शहरातील जे गरीब रुग्ण आहेत. फार मोठ्या आशेने उपचारासाठी येतात. परंतु, तासन तास त्यांना डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. वास्तविक पाहता आजार हा काही टाईम टेबल पाहून येत नाही किंवा अपघात काही सांगून होत नाही.त्यामुळे डॉक्टर हा २४ तास निवासी असणे बंधनकारक आहे. परंतु, डॉ.गिरीश चौधरी हे जळगाव निवासी आहेत याचा विचार करावा. ते केव्हा येत असतील आणि केव्हा जात असतील. धरणगाव शहरात डॉक्टर वेळेवर उपस्थित नसल्यामुळे अनेक गरोदर महिला, जेष्ठ नागरिक, अपंग,निराधार यांच्यावर अनेक वेळा कसे प्रसंग आले आहेत. ग्रामीण रुग्णलयाची पी.एम. रूम एखाद्या अधिकाऱ्याने बिना तोंडाला रुमाल बांधून जर पी.एम. रूम पहिला तर मी राजकीय सन्यास घेईल. परंतु आजही त्या ठिकाणी खराब अंगावरच्या कपड्यांचा ढीग पडलेल्या आहे .परिसर अतिशय अस्वच्छ आहे. संडासची टाकीत झाडे वाढली आहेत. इतरत्र इतकी दुर्गंधी व घाण आहे त्याचे कालच काढलेले सर्व फोटो सुद्धा जनतेच्या व पालकमंत्र्यांच्या, नगराध्यक्षाच्या व अधिकाऱ्यांच्या माहिती साठी पुराव्या निशी टाकत आहे. पालकमंत्र्यांनी उपजिल्हा रुग्णालया बाबत कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आदेश दिले असतांना सुद्धा डॉक्टरांनी काय पाठपुरावा केला .या आधी अनेक राजकीय पक्षांनी ग्रामीण रुग्णालय धरणगांव बाबत अनेक घटना घडल्यानंतर जिल्हा वैद्यकीय अधिकारी, आरोग्यमंत्री यांच्या कडे तक्रारी केल्या आहेत परंतु आपले काही होत नाही झाली तर बदली होते असा डॉक्टरांचा समज असतो. ना.पालकमंत्री गुलाबराव पाटील,जिल्हा रुग्णालय व आरोग्य मंत्री यांना लेखी स्वरूपाचे निवेदन मा.नगराध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील.सर यांनी दिले आहे.

 

Protected Content