गणित शिक्षकाचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी सुरू केले यूट्यूब चॅनल

धरणगाव, प्रतिनिधी । ग्रामीण भागातील मुले महागडे क्लास लावू शकत नाहीत. त्यामुळे १० वी सारख्या भावी जीवनाला वळण देणाऱ्या महत्वाच्या वर्षात सोयीसुविधा अभावी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. शिवाय वर्गात पुरेसा वेळही नसतो. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न अनोरे येथील शिक्षक ए. के. पाटील यांनी यूट्यूब चॅनलद्वारे मार्गदर्शन सुरु केला आहे.

अनोरे येथील बी. जे. महाजन विद्यालयातील शिक्षक ए. के. पाटील हे सुमारे २० वर्षांपासून गणित भूमिती सारख्या अवघड मानल्या गेलेल्या विषयात ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. सध्याच्या जगात प्रत्येक कुटुंबाकडे अँड्रॉइड मोबाइल आहे. याचा मुलांना काही उपयोग होईल का असा विचार त्यांच्या मनात घोळत होता. त्यातुन त्यांना यूट्यूब वर चॅनेल सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यांनी शालेय गणित नावाचे चॅनेल सुरू केले. या चॅनेल मार्फत आज ग्रामीण भागातील १० वी च्या विद्यार्थ्यांना गणितच नव्हे तर अनेक शालेय विषयांचे मार्गदर्शन होत आहे. ए.के. पाटील हे या चॅनेलवर अनेक विषयांच्या तज्ञाना बोलावून विविध विषयांची चर्चा घडवून आणतात. त्यातून मुलांच्या ज्ञानात भर पडून त्यांना १० वी चे चांगल्या पद्धतीने पेपर सोडविणे  शक्य होत आहे. या चॅनेलचे १५००० पालक व विद्यार्थी फॉलोव्हर झाले आहेत. या उपक्रमात त्यांना त्यांच्या संस्थेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक मंडळ,मुख्याध्यापक,शिक्षक,मित्रपरिवार यांचे प्रोत्साहन मिळत आहे. या उपक्रमाबाबत ए. के. पाटील यांनी सांईगीते की,  ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे शक्य व्हावे व आजकाल सर्वांच्या हातात असलेल्या अनरॉइड मोबाईलची यात मदत व्हावी या कल्पनेतून हा उपक्रम सुचला व राबविणे शक्य झाले. यापुढे सर्वच वर्गाच्या मुलांसाठी गणित सोपे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करून दाखवला.

Protected Content