शिक्षकांनी बदल स्वीकारत अद्यावत शिक्षण आत्मसात करावे : माजी कुलगुरू प्रा. माळी

जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण पध्दतीत दिवसेंदिवस बदल होत आहेत हे बदल स्वीकारून शिक्षकांनी अद्ययावत शिक्षण आत्मसात करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.आर.एस.माळी यांनी केले. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मानव संसाधन केंद्र व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस येथे ‘रोल ऑफ टिचर्स ईन अकेडमिक, रिर्सच अॅण्ड इंडस्ट्री’ या विषयावर ऑनलाईन रिफ्रेसर कोर्सचे आयोजन दि.१७ ते ३० ऑगस्ट, २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रा.आर.एस.माळी बोलत होते. यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांची ऑनलाईन अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ.सचिन सुर्वे, कबचौउमविचे माजी प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे, प्रा.आर.एस.बेंद्रे, समन्वयक प्रा.डी.एस.दलाल उपस्थित होते. प्रा.आर.एस.माळी म्हणाले की, अकॅडमीक संशोधन हे केवळ विद्यापीठापुरते मर्यादीत न राहता औद्योगिक क्षेत्र व समाज उपयोगी पडेल असे असावे. यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस प्रशाळेने रि फ्रेसर कोर्स आयोजित केल्या बद्दल समाधान व्यक्त केले. प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी विद्यापीठ कायदा, युजीसी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणनुसार शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्श आहे. त्यामुळे वर्गात शिकविण्यापुरतेच शिक्षकांचे काम आता राहिले नूसन विद्यार्थ्यांना सर्व गुणांनी परिपूर्ण बनविणे महत्वाचे आहे. या ऑनलाईन रिफ्रेसर कोर्सला महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, राज्यस्थान, पंजाब आदी राज्यातून ३६ प्राध्यापक सहभागी झाले आहेत. यावेळी प्रा.डी.एस.मोरे यांनी प्रशाळेची माहिती दिली. प्रास्ताविक प्रा.डी.एस.दलाल यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.पवन बाविस्कर यांनी केले. प्रा.अमरदिप पाटील यांनी आभार मानले.

 

Protected Content