विद्यापीठातर्फे डॉ. तेजपाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमाला

जळगाव, प्रतिनिधी । डॉ. तेजपाल यांच्या कांदबऱ्यांवर गांधीवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव दिसून येतो असे प्रतिपादन सुप्रसिध्द हिंदी साहित्यिक डॉ.ओमप्रकाश शर्मा यांनी केले. 

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित स्व. डॉ.तेजपाल चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना डॉ.ओमप्रकाश शर्मा बोलत होते. यावेळी डॉ.उर्मीला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शर्मा म्हणाले की, सत्य, अहिंसा, शिक्षण, स्त्रीयांचा सन्मान, स्वदेशी, सत्याग्रह अशा गांधी विचारांचा प्रभाव डॉ.चौधरी यांच्या साहित्यामध्ये दिसून येतो. हे विचार लादलेले नव्हते तर गांधी विचारांची सरमिसळ त्यांच्या व्यक्तीमत्वामध्ये झालेली होती. यावेळी डॉ.उर्मीला पाटील यांनी डॉ.चौधरी यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. सुत्रसंचालन डॉ.विजय लोहार यांनी केले. प्रा.मनिषा महाजन यांनी आभार मानले.

 

Protected Content