जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा-हुडको परीसरात रविवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक करत धक्काबुक्की व हाणामारी करणाऱ्या ९ जणांविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन तरूणांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंप्राळा-हुडको परीसरातील ज्ञान साधना मराठी शाळेसमोर रविवारी रात्री १०.३० सुमारास १० ते १५ जणांचा घोळका जमवून आपापसात झोंबाझोंबी करत धक्काबुक्की व मारहाण होत असल्याची माहिती रामांनद नगर पोलीसांना मिळाली. नेमकी हाणामारी कोणत्या कारणावरून झाली हे कळू शकले नाही. पोलीस अपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन,पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी तत्काळ पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी राकेश जयराम मोरे (वय-२०), सुभाष प्रल्हाद पवार (वय-४०), अभय अनिल आढागंळे (वय-१८), दुर्गेश सुभाष पवार (वय-१८), शुभम पवार, बबलू सोनवणे, मनोज भालेराव, लताबाई मोरे, आश्विन सोनवणे सर्व रा. पिंप्राळ हुडकी यांच्या विरोधात पोहेकॉ ज्ञानेश्वर कोळी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात भादवि कलम ३३७, १६० जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत राकेश जयराम मोरे (वय-२०), सुभाष प्रल्हाद पवार (वय-४०) हे दोघे जखमी झाले. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. पुढील तपास पो.ना. राजेश भावसार करीत आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज राठोड, स.फौ. गोपाळ चौधरी, पो.कॉ. विजय खैरे, योगेश पवार, पोकॉ. उमेश पवार, रूपेश ठाकरे, तुषार विसपुते, राकेश दुसाने यांनी घटनास्थळी जावून कारवाई केली.