तापीनदीजवळ गुटखा, तंबाखू व पानमसाला वाहतूक करणारे वाहन पकडले

भुसावळ-लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील तापी नदीच्या पुलाजवळ बेकायदेशीररित्या गुटखा, तंबाखू व पानमसाला घेऊन जाणाऱ्या वाहनावर भुसावळ शहर पोलिसांनी गुरुवार २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता कारवाई करत सुमारे १ लाख ७४ हजार ३१४ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, एक तरुण हा नॅनो कारमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, तंबाखू आणि पानमसाला घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.  गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता पथकाने कारवाई करत भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलाजवळ नॅनो कार क्रमांक (एमएच १२ जेझेड ६७१६) ही कार अडविली. यात कारचालक किशोर राजकुमार आगीचा रा. सिंधी कॉलनी, भुसावळ याची चौकशी केली असता कारमध्ये अवैधरित्या गुटखा व पानमसाला घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान पोलिसांनी १ लाख ७४ हजार ३१४ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किशोर राजकुमार आगीच्या याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.

Protected Content