गिरडगाव येथील पाझर तलाव कार्यक्षेत्रातील ‘त्या’ वृक्षतोडप्रकरणी व्यापाऱ्यास अटक करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील गिरडगाव येथील पाझर तलावातील कार्यक्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी येथील व्यापाऱ्यावर यावल पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होवून पंधरवाडा होवूनही अद्याप कोणतही कारवाई केले नाही. संबंधित व्यापाऱ्यावर तत्काळ कारवाई व्हावी अशी मागणी गिरडगाव ग्रामपंचायततर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.

जिल्हा परीषदेच्या लघु सिंचन विभागाच्या पाझर तलाव कार्यक्षेत्रातून एका लाकूड व्यापाऱ्याने बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सरपंच यांच्या फिर्यादीवरून लाकूड व्यापारी शहा खलील याच्यासह इतर १२ जणांविरोधात १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होवून आज १५ दिवस झाले तरी लाकूड व्यापारीवर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. कोणताही विलंब न करात लाकूड व्यापाऱ्यावर १४४ प्रमाणे गुन्हात कलम वाढून अटक करावी आणि करवाई करून मुद्देमाल हस्तगत करावा अशी मागणी गावातील सरपंच

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सरपंच अलका पाटील, सरपंच पती मधुकर पाटील, ग्रामसेवक भोजराज फालक, उपसरपंच आनंदा पाटील, पोलीस पाटील अशोक पाटील, ग्रा.पं. सदस्य नितीन पाटील, भागवत पाटील, ग्रामपंचायत शिपाई भावडू पाटील, पांडू पाटील व गिरडगाव ग्रामस्थ यांनी यावर पोलीस स्टेशनला हजर होऊन शोशल डिशटेन्शन ठेवून साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रति पंतप्रधान, वनविभाग, मुख्यंमंत्री, गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.

Protected Content