पुण्यात रात्रभरात कोरोनाचे तब्बल ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ

पुणे (वृत्तसंस्था) रविवारी रात्रभरात पुण्यात कोरोनाचे तब्बल ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या १३१९वर पोहोचली आहे.

 

 

पुण्यातील कसबा, भवानी पेठ, येरवडा, हडपसर या क्षेत्रीय कार्यालय परिसरात हे करोनाचे रुग्ण सापडले आहेत. हा परिसर झोपडपट्ट्यांचा असून यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क होता. त्यामुळे रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून रुग्ण तपासणी आणि चाचणी सुविधामध्ये वाढ केल्याने ही आकडेवारी वाढल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. दरम्यान, पुण्यातील करोना रुग्णांची संख्या १ हजार ३१९वर गेली आहे. तर २०६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून करोनामुळे दगावलेल्यांची संख्या ७७वर गेली आहे. दुसरीकडे पुणे शहर जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळपर्यंत ५५ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे काल शहर जिल्ह्यात १२६४ रुग्ण झाले होते, ही संख्या आता १३१९वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ७० ते १०० पर्यंत रुग्ण संख्या वाढत आहे.

Protected Content