जळगाव जिल्ह्यात आज नवीन ७५ कोरोना बाधित रूग्ण आढळले !

जळगाव (प्रतिनिधी) आज संध्याकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात एकूण ७५ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे आता रूग्णांचा आकडा सोळाशेच्या उंबरठ्यावर आल्याचे दिसून आले आहे.

 

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार जळगाव शहर – १५ ; जळगाव ग्रामीण – २ भुसावळ – ६ ; अमळनेर – ६ ; रावेर – १०; भडगाव – ०; चोपडा- ० ; पाचोरा- ३; धरणगाव – ४; जामनेर – ३; यावल – ३; एरंडोल – ८ ; पारोळा- १०; चाळीसगाव – १ बोदवड- २; मुक्ताईनगर – ०; बाहेरील जिल्ह्यातील- ०२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या १७२८ इतकी झाली आहे.

 

आज आलेल्या रिपोर्टनंतर जिल्ह्यात आजवरील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही १७२८ इतकी झालेली आहे. यामध्ये सर्वाधीक रूग्ण संख्या जळगाव तालुक्यात (शहर ३१२ + ग्रामीण ५४) ३६६ इतकी आहे. याच्या खालोखाल भुसावळ तालुक्यातील रूग्णांची संख्या ३०९ इतकी झालेली आहे. यानंतर अमळनेर-२२७ ; चोपडा-११८; रावेर-१२६; भडगाव-९३; यावल-९२; धरणगाव-८४; जामनेर-८३; पाचोरा-४३; एरंडोल-५१; पारोळा-८६; चाळीसगाव-१८; मुक्ताईनगर – १२, बोदवड-१४ व इतर जिल्ह्यातील ६ रूग्णांचा समावेश आहे.

Protected Content