रावेर तालुक्यात संसर्ग वाढला; नागरिकांनो आतातरी जागे व्हा !

रावेर (शालीक महाजन) । लॉकडाऊन शिथिलता मिळताच सुमारे महिन्याभरात रावेर तालुक्यात १२६ कोरोनाबाधित रूग्ण आढळलेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नगरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन तालुका व आरोग्य प्रशासनाने केले आहे.

रावेर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा १२६ जरी पोहचला तरी रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत झाले आहे. आत्तापर्यंत ५१ रूग्ण बरे होवून घरी पाठविण्यात आले आहे. तर १६ जणांचा मृत्यू झालाय. अजुनपर्यंत कोरोना वर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने पुढे अजुन मोठा धोका तालुक्याला आहे.

रावेर तालुक्यात २१ मार्च पासुन लोकडाऊन लागल्या नंतर सुमारे दोन महिन्यांनी म्हणजे पासुन १९ मे रोजी सावद्यात पहिली महिला कोरोना पोझिटीव्ह मिळाली होती. कोरोना तालुक्यात येऊ नये म्हणून महसूल प्रशासनाचे प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसिलदार उषाराणी देवगुणे, पोलिस प्रशासनाचे रामदास वाकोडे, आरोग्य प्रशासनाचे डॉ.एन.डी. महाजन, डॉ. शिवराय पाटील, पालिकेचे रविंद्र लांडे या सर्वांनी आटापीटा केला परंतु कोरोनाने तालुक्यात दस्तक दिलीच आणि आता रोज कोरोना पोझिटीव्ह रूग्णांमध्ये बरीच वाढत झाली आहे. याला सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांचा होणार हलगर्जीपणा जबाबदार आहे.

शासनाचे कोणत्याच आदेशाचे पालन करतांना लोकांमध्ये दिसत नाही. रावेर शहरातील प्रसिध्द डॉ.संदीप पाटील लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगतात की, माझ्या आयुष्यात एवढ्या वेगाने संसर्ग करणारा व्हायरस मी पहिल्यांदाच पाहिला आहे. यावर अजुन औषध उपलब्ध नसल्याने आटोक्यात येणे शक्य नाही. तालुक्यातही एका महिन्यात १२६ रूग्णांची संख्या झाली. पुढील तीन महिन्यात अजून उग्र रूप धरणार असल्याचे बोलले जात आहे. डॉ.संदीप पाटील स्त्रीरोग तज्ञ असून ते पुढे सांगतात की, तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखणे शासन, राजकीय पुढारी, डॉक्टर यांच्या हाती नसुन आता ही जबाबदारी सर्वसाधारण नागरिकांच्या हाती असल्याचा इशारा त्यांनी तालुक्यातील जनतेला दिला आहे.

२५ दिवसांत १२६ पॉझिटीव्ह
तालुक्यात १९ मे ते १४ जून पर्यंतच्या २५ दिवसांत तालुक्यात एकूण १२६ रुग्ण पोझीटीव्ह आढळून आले आहेत.तर आतापर्यंत एकूण १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तालुक्यातील एकूण ५१ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना कोविड सेंटरवरून घरी सोडण्यात आले आहे.

१५ गावात कोरोनाची लागण
तालुक्यात सावदा येथे २५ दिवसापूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यावर रावेर शहरासह ग्रामीण भागातील १५ गावात कोरोनाचा फैलाव झाला आहे. ग्रामीण भागातील; निंभोरासीम, मस्कावद सीम, मस्कावद बुद्रूक, गाते, वाघोदा खुर्द, चिनावल, कुंभारखेडा, खानापूर, ऐनपूर, कुसुंबा बुद्रूक, वाघोदा बुद्रूक व रमजीपूर या गावात पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Protected Content