चोपडा येथे पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड : ११ अकरा जणांवर कारवाई

चोपडा प्रतिनिधी– येथील अग्रसेन भवनच्या आवारात अकरा जन जुगार खेळत असतांना पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या पथकाने अचानक धाड टाकून एक लाख बारा हजार रुपयांचा रोख रकमेसह ऐवज जप्त करण्यात आला आहे.

२६ रोजी संध्याकाळी ५:३५ वाजेच्या सुमारास शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या अग्रसेन भवनाच्या मोकळ्या ओट्यावर ५२ पत्त्यांचा जुगार खेळतांना पोलिसांनी छापा टाकून अकरा जणांना रंगेहात पकडले. यात एक लाख बारा हजाराचा ऐवज त्यात ५२ हजार रोख तर ६० हजार रुपये किंमतीचे अकरा मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहे.

याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी सुभाष वासुदेव सपकाळ यांच्या फिर्यादीवरून सुधाकर शांताराम चौधरी (४३) महावीर नगर, अभिजित योगराज देशमुख (३४)गणेश कॉलनी,अशोक आसाराम पाटील (५२) भाग्योदय नगर, रितेश विनोद डिसा (३९) गुजराथी गल्ली , राम शंकरलाल सोमाणी (५२) भावसार गल्ली, अजय प्रकाश अग्रवाल (५६) बाळजीमंदिर जवळ चोपडा, अलोक संतोष अग्रवाल (२९) धानोरा, अमोल सुरेश कासार (३८) मोठा देव्हारा, ललीत प्रकाश अग्रवाल (३०) गोलमंदिर, मोतीलाल गोपाल साळुंखे (२९) खरद, विलास मोतीराम सूर्यवंशी (३८) बारगनअली चोपडा या आरोपितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष पारधी हे करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content