गेंदालाल मिल परिसरातील दोन गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

 जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचे आदेश 

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरात राहणारे दोन गुन्हेगारांना जिल्हा अधीक्षक राजकुमार यांनी जळगाव जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे त्यानुसार शहर पोलिसांनी दोघांना जिल्हा हद्दपार केले आहे.

जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पोलिसात  एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर सामनेवाले यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी डीवायएसपी संदीप गावित यांनी केले होते.

दोन्ही गुन्हेगार हे टोळीने राहून जळगाव शहरात जिल्हयांत ठिकठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालीला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांत शांतता सुव्यवस्था ठेवण्याबाबत त्यांचे विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल असून त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता दोघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेऊन जिल्हा हद्दपार केली आहे.

Protected Content