वृध्द महिलेची २ लाख ४० हजारांची फसवणूक

 धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणी गावातील वृद्ध महिलेला बनावट लेबल लावून जुने मशीन नवे दाखवून २ लाख ४०हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात अन्नपूर्णा खंडेराव पाटील (वय-७२) या महिला आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शेतीसाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात टिलर करण्याचे साहित्य घेण्यासाठी पृथ्वीराज मोटर्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खेडकर रा.नेवासा ता. शेगाव जिल्हा अहमदनगर  याचे यांच्याशी १४ मार्च २०२३ ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी संपर्क साधून २ लाख ४० हजार रूपये किंमतीचे पॉवर टिलर घेण्याचे ठरले.  परंतू बाबुराव खेडकर याने वृद्ध महिलेला ठरल्याप्रमाणे पॉवर टिलर न  देता किर्लोस्कर कंपनीची बनावट लेबल लावून जुने मशीनला कलर देऊन ते नवे असल्याचे पासून पॉवर टिलर हे दिले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अन्नपूर्णा पाटील यांनी धरणगाव पोलिसात धाव घेतली. वृद्ध महिने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता अहमदनगर येथील पृथ्वीराज मोटार्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खंडेराव खेडकर यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.

Protected Content