तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गुड शेफर्ड इंग्लिश मिडियम स्कुलच्या मुलींना यश

dharangaon girls

धरणगाव प्रतिनिधी । साळवा येथे नुकताच झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गुड शेफर्ड इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थिनींनी कबड्डी स्पर्धेत विजय संपादन करुन जिल्हास्तरावर झेप घेतली आहे.

याबाबत माहिती अशी की, या सामना वय वर्ष 14 आतील गटात खेळण्यात आला होता. साळवा विरुद्ध झालेल्या कालच्या अंतिम सामन्यात ५-५ मिनिटांचे २ राउंड झाले. त्यात पहिल्या राऊंडमध्ये १ गुणाने पिछाडीवर असलेल्या गुड शेफर्डच्या संघाने दुसऱ्या राउंड मध्ये एकतर्फी खेळ करत सामना ६ गुणांनी जिंकला. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी विद्यार्थिनींच्या सत्कार केला. शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी देखील त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक अमोल सोनार व शिक्षिका सपना पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Protected Content