यावलमध्ये पाच लाखांची अवैध दारू जप्त

d7224c56 2eef 4b50 b2d0 b52299b9c1c5

यावल प्रतिनिधी । येथील टि पॉइंटवर पोलीस पथकाला तपासणीच्या दरम्यान साडे पाच लाख रूपयांची अवैध दारू आढळून आल्याची घटना आज पहाटे घडली.

 

याबाबत वृत्त असे की, आज सकाळी संदीप छगन भोई व रमजान तडवी हे पोलीस कर्मचारी नाकाबंदीच्या दरम्यान वाहनांची तपासणी करत असतांना त्यांना एमएच ०४ एफपी ४५९० या क्रमांकाच्या छोटा हत्ती या वाहनावर संशय आला. याचा चालक अनुराग अजय श्रीवास्तव याची चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. यामुळे त्यांनी वाहनाची तपासणी केली असता यात अवैध दारूचा मोठा साठा आढळून आला. यात देशी-विदेशी मद्यसाठी आणि बियर आढळून आली. हा सर्व माल ५,४६,१८० रूपयांचा असल्याचे पंचनाम्यातून आढळून आले. यामुळे चालकाला ताब्यात घेण्यात आले असून वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Protected Content