रिक्षाच्या धडकेत दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी

मुळजी जेठा महाविद्यालयाजवळील घटना 

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत किरण सुभाष शार्दुल (३९, रा. हरीविठ्ठल नगर) यांच्यासह त्यांच्या पत्नी आशा शार्दुल व मुलगा गिरीश हे तिघे जण जखमी झाल्याची घटना बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुळजी जेठा महाविद्यालयाजवळ घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी किरण शार्दुल हे पत्नी व मुलासह दुचाकीने (क्र. एमएच १९, डीएस ५८६१) बाजारात जात असताना मू.जे. महाविद्यालयासमोर भोईट कॉम्पेक्स जवळ समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाने (एमएच १९, व्ही ७१८७) धडक दिली. यात शार्दुल यांच्या डोक्याला व उजव्या पायाला तर त्यांच्या पत्नीला उजव्या हाताला व पायाला मार लागला. तसेच मुलगा गिरीशचा पाय फॅक्चर झाला व डोक्याला मुक्का मार लागला आहे. रिक्षा चालकाने त्याचे नाव शिवदास बारी (रा. हरीविठ्ठल नगर) असे सांगितले. हा चालकच तिघांना रुग्णालयात घेऊन गेला. उपचाराचा खर्च मागितला असता चालक तेथून निघून गेला. याप्रकरणी किरण शार्दुल यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content