नगरसेवक निर्मल कोठारींतर्फे इन्फ्रारेड थर्मामीटर भेट

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांच्यातर्फे नगरपालिकेच्या रूग्णालयास दोन इन्फ्रारेड थर्मामीटर भेट देण्यात आले असून याचा कोविड-१९च्या प्राथमिक लक्षणांची तपासणी करतांना मदत होणार आहे.

भुसावळ पालिकेच्या संत गाडगेबाबा रूग्णालयात कोविड-१९ म्हणजेच कोरोना विषाणूच्या बाधेच्या संशयातून अनेक रूग्ण दाखल होत आहेत. येथे त्यांची प्राथमिक तपासणी करून आवश्यकता भासल्यास पुढील उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात पाठविण्यात येते. दरम्यान, इन्फ्रारेड थर्मामीटरच्या मदतीने दूरवरून रूग्णाच्या शरिराचे तापमान हे अतिशय अचूकपणे मोजता येते. कोरोनाच्या लक्षणांच्या तपासणीसाठी हे अतिशय उपयुक्त उपकरण असले तरी येथील रूग्णालयात ते अद्याप नव्हते. ही समस्या लक्षात घेऊन नगरसेवक पिंटू कोठारी यांनी नगरपालिका रूग्णालयास दोन इन्फ्रारेड थर्मामीटर भेट म्हणून दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर यांना हे थर्मामीटर सुपूर्द करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content