बैलाने शिंग मारल्याने शेतकऱ्याच्या दुदैवी मृत्यू !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील टिटवी येथे बैलाला पाणी पाजणाऱ्या शेतकऱ्यास बैलाने शिंग मारल्याने त्याचा मृत्यू झाला. पारोळा तालुक्यातील टिटवी येथे गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता ही घटना घडली. प्रकाश तोताराम पाटील (वय-५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पारोळा तालुक्यातील टिटवी येथे प्रकाश तोताराम पाटील हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान २७ रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बैलाला पाणी पाजणाऱ्या शेतकऱ्यास बैलाने शिंग मारल्याने प्रकाश तोताराम पाटील यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान बैलानेच मालकाचा जीव घेतल्याने टिटवी गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content