चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपरखेड येथे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून १७ हजार रुपये किंमतीचे टिव्ही चोरी करताना चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याने त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील कोंडीराम भावडू गोयकर हे कुटूंबासह शेतात वास्तव्यास असून घर त्यांनी संत गोयल या भाडेकरूला राहायला दिलेले आहेत. दरम्यान घराचे कुलूप लोखंडी रॉडने तोडून घरातील १७ हजार रुपये किंमतीची टीसीएल कंपनीची टिव्ही चोरून नेतांना ग्रामस्थांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले. हि घटना रविवार रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास उघडकीला आली. ग्रामस्थांनी सदर चोरट्याला त्याचे नाव विचारले असता गोकुळ हंसराज राठोड (वय-४०) रा. सांगवी ता. चाळीसगाव असे त्यांनी सांगितले. त्यावर निलेश विष्णू सुर्यवंशी रा. पिंपरखेड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गोकुळ हंसराज राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दिपक ठाकूर हे करीत आहेत.
पिंपरखेड येथे भाडेकरूच्या घरात चोरी; गुन्हा दाखल!
3 years ago
No Comments