पारोळ्यात आजी-माजी आमदारांची एकाच व्यासपीठावर हजेरी

parola news 4

पारोळा, प्रतिनिधी | शहरातील बोहरा सेंट्रल स्कूलच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने माजी आमदार डॉ.सतीश पाटील व विद्यमान आमदार चिमणराव पाटील नुकतेच एकत्र आले होते. वरिष्ठ नेत्यांनी महाविकासआघाडीच्या निमित्ताने आमच्यातील अंतर कमी करून टाकले आहे, मग आम्ही दुरावा का ठेवावा, असे मत उभय नेत्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

यावेळी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी मात्र या दोन्ही नेत्यांनी सोडली नाही. या वेळी डॉ.सतीश पाटील यांनी पुतण्या नगराध्यक्ष करण पवार यांना म्हटले की, आम्ही महाविकास आघाडी निमित्त एकत्रित आलो. पण तू भाजपचा असल्याने तू दूर आहेस. मात्र हे राजकीय व्यासपीठ नाही. त्यावर आ. चिमणराव पाटील यांनीही कोपरखळी मारत ‘आम्ही ४० वर्षांपासून एकमेकांपासून दूर होतो. पण महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आमची लढाई वैचारिक होती. आता आमच्यात कोणतेही वैर वा दुश्मनी नाही’, असे सांगितले. यावेळी संमेलनात एकच हशापिकला.

व्यासपीठावर आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार डॉ.सतीश पाटील, नगराध्यक्ष करण पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, नगरसेवक कैलास चौधरी, संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा, यू.एच. करोडपती, डॉ. शांताराम पाटील, सी.ए.मुकेश चोरडिया, गोपाल अग्रवाल, प्रवीण दाणेज, पी.एस.आय. लीलाधर कानडे, उपनिरीक्षक बागुल आदी उपस्थित होते.

Protected Content