पारोळा,प्रतिनिधी । तालुक्यातील मेहू-टेहू येथील एका महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करून दोन मोठ्या गाठी काढण्यात गजानन हॉस्पिटलचे डॉ. मनीष पाटील व त्यांच्या सहकारी डॉक्टरांना यश आले आहे. यासाठी समर्थ टेंडर्सचे मालक गजेंद्र पाटील यांनी अर्थसहाय्य केले आहे.
मेह- टेहू येथील मालूबाई सुका पाटील यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना श्री गजानन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. डॉ. मनीष पाटील यांनी
तपासणी करून सोनोग्राफीचा सल्ला दिला. सोनोग्राफीत गर्भ पिशवी जवळ दोन मोठ्या गाठी आढळून आल्या. डॉ. मनीष पाटील यांनी पाहिले असता लागलीच शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. पण श्रीमती पाटील यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने अडचण निर्माण झाली. शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने समर्थ ट्रेडर्सचे मालक गजेंद्र पाटील यांनी आर्थिक सहकार्य करून दातृत्व दाखविले. त्यानंतर डॉ. मिताली बनसोडे, डॉ. संजय बनसोडे, डॉ. मनीष पाटील व डॉ. उर्मिला पाटील यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. श्रीमती पाटील यांना जीवदान मिळाले असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. महिलेस जीवदान दिल्याबद्दल रुग्णाच्या परिवार गावातील नागरिकांनी व नातेवाइकांनी डॉक्टरांचे आभार मानले.