औरंगाबादेत महिलेला करोनाची लागण; राज्यातील आकडा ३२ वर

औरंगाबाद वृत्तसंस्था । राज्यातील करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला, औरंगाबादमधील ५९ वर्षिय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३२ वर पोहचला आहे.

औरंगाबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. या महिलेच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानचा प्रवास करून आली असल्याचे सांगण्यात येत. या महिलेला धूत रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर ही महिला ज्या लोकांच्या संपर्कात आली होती, त्या सर्वांची माहिती घेण्यात येणार असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

जोतिबा मंदिराच्या शेवटच्या खेट्यावर कोरोनाचा परिणाम झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील जोतिबाचे दर्शन मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Protected Content