पारोळा प्रतिनिधी । येथील शासकीय गुरांच्या दवाखान्यात औषध उपलब्ध नसल्याने खाजगी मेडीकल मधून औषध विकत आणून उपचार करावे लागत असून येथील वैद्यकीय अधिकारी देखील वेळेवर उपलब्ध राहत नसून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे गोरक्ष प्रमुख विनोद हिरामण खाडे यांनी गट विकास अधिकारी यांना केली आहे.
शनिवार ५ डिसेंबर रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे गोरक्ष प्रमुख विनोद हिरामण खाडे हे शासकीय गुरांच्या दवाखान्यात उपचारासाठी पाय मोडलेल्या अवस्थेत एका म्हाताऱ्या गायीस घेऊन गेले होते. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. ते थोड्या वेळाने दवाखान्यात आले असता गायीच्या उपचारासाठी औषधे नव्हती. ही औषधी खाजगी मेडिकल मधून मागविण्यात आलीत. या दवाखान्यात किती औषधी साठा उपलब्ध आहे ? वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आहेत का ? की शासकीय वैद्यकीय अधिकारी व मेडिकल चालक यांच्यात काही संगनमत आहे का ? आदी प्रश्न विनोद खेड यांनी उपस्थित करून या सर्व प्रकारची चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. याप्रसंगी विनोद राठोड, विहीन बारी, विजय पाटील, बाळा पाटील, मच्छिंद्र पवार ,विनोद पाटील ,संभाजी पाटील दत्तू पाटील ,भैय्या चौधरी, समाधान धनगर, धनराज पाटील, गोरख चौधरी आदी उपस्थित होते