माऊंट एव्हरेस्टची उंची ०.८६ सेंटीमीटर वाढली

काठमांडू ( नेपाळ ) : वृत्तसंस्था । जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची नवी उंची मंगळवारी नेपाळकडून जाहीर करण्यात आली. नवी उंची ८,८४८.८६ मीटर आहे आणि ही उंची आधीपेक्षा ०.८६ सेंटीमीटर एवढी वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली.

जवळपास वर्षभर या शिखराची उंचीच्या मोजमापावर काम सुरू होते. त्यानंतर अखेर मंगळवारी नेपाळकडून एव्हरेस्टची नवी उंची अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

२०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये एव्हरेस्टचा काही भाग खचला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर नेपाळ सरकारने ही उंची पुन्हा एकदा मोजण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल असं स्पष्ट केलं होतं. भूकंपानंतर हे शिखर काहीसं खचलं असल्याची शक्यता असल्याने पुनर्मोजणीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

भूकंपाच्या घटनेनंतर चीनमधील आणि इतर काही संस्थांनी ‘माऊंट एव्हरेस्ट’ची उंची मोजण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातच नेपाळ सरकारने स्वतः यासाठी पुढाकार घेत चीनसोबत संयुक्तपणे मोजणी करत ही नवी उंची जाहीर केली.

Protected Content