पारोळा येथे महामार्गावर वाहतूक कोंडी ; वऱ्हाडींमध्ये नाराजी

parola 5

पारोळा, प्रतिनिधी । शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाहतुकीचा खोळंबा ही शहरासाठी नित्याची बाब झाली आहे. या वाहतूक खोळंब्याचा फटका वऱ्हाडींच्या लहान मोठ्या वाहनांना बसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शहरातून जवळपास तीन किमी राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यात कजगाव चौफुली, अमळनेर रोड, उंदीरखेडा रोड , भडगाव नाका , बस स्टॅन्ड आदी ठिकाणी वाहतुकीचा काही ना काही कारणास्तव खोळंबा होतो. आज देखील सकाळी साडे दहा वाजता याचा अनुभव आला. आज लग्न तिथी मोठी असल्याने असंख्य वाहने ही आज महामार्गावरून धावत होती. कजगाव चौफुली जवळ या खोळंबला आज सकाळी सुरुवात झाली. त्यामुळे शितल डेअरी ते किसान महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा या लागल्या होत्या. शेकडो वाहनासह वऱ्हाडी चे व खाजगी वाहने अटकून पडली होती. वाहतूक पोलीस सत्यवान पवार हे ती वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत होते. बेशिस्तपणे वाहने इकडे तिकडे घुसविल्याने वाहतूक सुरळीत होण्यास अडथळे येत होती. बऱ्याच प्रयत्नानंतर ही वाहतूक सुरळीत झाली होती. लग्न तिथी दिवशी विशेषता वाहतुकीचा खोंळबा होताना दिसून येत आहेत.

अडथळे दूर करण्याची गरज
राष्ट्रीय महामार्गावर अनेक खाजगी प्रवासी वाहने ही ठीक ठिकाणी ही उभी असतात. तसेच काही ठेला गाडीधारक देखील माहमार्गाच्या बाजूला उभे राहून पदार्थ विकतात. महामार्गावरील काही दुकाने, हॉटेल बाहेर अतिक्रमण, वाहने ही उभी राहतात. त्यामुळे वाहतूकिला अडथळे येतात. हे अडथळे पोलिसांनी दूर करणे व नियमितपणे त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परंतु, त्याबाबत पोलीस प्रशासन उदासीन आहे. तसेच ठिक ठिकाणी वर्दळीच्या वेळी वाहतूक पोलीस थांबवणे गरजेचे आहे. परंतु, त्याकडे देखील दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. वाहतूक कोंडीची समस्या कायम शहराला भेडसावत आहे.

Protected Content