कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातील दोघांना संसर्गाची लक्षणे नाहीत

पारोळा प्रतिनिधी । नंदुरबार जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या येथील त्याच्या दोघा नातेवाईकांची कोरोनाची प्राथमिक कुठलीच लक्षणे आढळून न आल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणी करून त्या दोघांना सोडून देण्यात आले आहे. त्यांना होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात शहरातील नाष्कार गल्लीमधील एक माध्यमिक शिक्षक व सारवे येथील एक असे दोन नातेवाईक आले असल्याची माहिती पुढे आली होती. त्या माहिती अनुषंगाने १८ रोजी सायंकाळी वैद्यकीय अधिकारी व पोलीस प्रशासन या दोघांनी या दोन्ही नातेवाईकांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास रवाना केले होते. रात्रीच त्यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तपासणीत कोरोना रुग्णाच्या संबंधित लक्षणे या दोघांना मध्ये आढळून आली नाहीत. म्हणून त्यांना सोडून देण्यात आले. धोका नको म्हणून या दोघांना स्वतःच्या घरातच होम क्वारंटाईन या प्रकारात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंके व इतर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान तालुक्यासह शहरात यामुळे आज खळबळ उडाली होती. तसेच चिंतेचे देखील वातावरण निर्माण झाले होते. या रुग्णांना मध्ये लक्षणे दिसून न आल्याने व त्यांची रुग्णालयाकडून सुटका करण्यात आल्याने तालुक्यातील जनतेने नि:श्‍वास सोडला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content