पारोळा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद  

 

पारोळा प्रतिनिधी ।  दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पारोळ्यात उस्फूर्त प्रतिसाद  मिळाला.

 आज पारोळा येथे शेतकरी भारत बंद आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून  मोठे व्यापारी, आडत दुकानदार, किराणा दुकानदार, बूट चप्पलचे दुकान, हातगाडीवाले, भाजीपाला मार्केट, ज्वेलर्सचे दुकान बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला येथील व्यापारी मंडळींनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.   भारत बंद आंदोलनासाठी सर्व पक्षीय महा विकास आघाडी तर्फे आमदार  चिमणराव पाटील, माजी पालकमंत्री प्रदेश उपाध्यक्ष सतिष पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या मार्गदरशनाखाली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान ,उपाध्यक्ष प्रा. संजय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे, उप प्रमूख भूषण भोई, मार्केट कमिटीचे संचालक मधुकर पाटील, जि. प. सदस्य रोहन पाटील, माजी नगरसेवक रमेश महाजन, युवासेना प्रमुख आबा महाजन, सावंत, शिंपी, आबा पाटील, राष्ट्रवादीचे शहाध्यक्ष संजय बागडे, युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे, युवक अध्यक्ष गणेश पाटील, माजी तालुका अध्यक्ष शांताराम पाटील व सामाजिक संघटनेचे भीम आर्मीची तालुका अध्यक्ष जितेंद्र वानखेडे, आरपीआयचे  राज्य उपाध्यक्ष राजेंद्र जावरे, तालुका तालुका अध्यक्ष दयाराम मोरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामराव पाटील, छावा संघटना तालुकाध्यक्ष विजय पाटील, शिव छाया संघटनेचे  जिल्हाध्यक्ष सागर  भोसले, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष कपिल चौधरी, शिवछावा संघटनेचे शहराध्यक्ष ईश्वर पाटील आदी कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत व्यापारी मंडळींना बंदचे आवाहन केले होते. या आवाहनास  व्यापारी मंडळींनी शंभर टक्के प्रतिसाद देत दुकान बंद ठेवली.  महा विकास आघाडीतर्फे सर्व व्यापार बंधूंच्या आणि छोटे गाडीवाले यांच्या जाहीर आभार मानण्यात आले.

Protected Content