सुवर्ण व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; चौकशीची मागणी

पारोळा प्रतिनिधी | नाशिक येथील सुवर्ण व्यापारी विजय बुधूशेठ बिरारी यांचे संशयास्पद झालेल्या मुत्यूची निष्पक्ष चौकशी करून हैद्राबाद पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या बाबत निवेदन श्री लिलाधर कानडे सोा.पो. नि.पारोळा यांसी सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष योगेश सोनार, उपाध्यक्ष मिलिंद विसपुते, सचिव सुनील भालेराव, माजी अध्यक्ष अनिल टोळकर, किशोर वाणी, सदस्य शांताराम टोळकर, अमोल दाणेज, विजय सराफ, महावीर जैन, किरण सोनार, गणेश सोनार, गिरीश टोळकर, नरेंद्र जडे,आशिष वाणी, मयूर मालपुरे, अरूण सोनार, बापू सोनार, सुनील सोनार, सोमनाथ टोळकर, आदित्य सोनार आदी असो चे पदाधिकारी, सुवर्णकार कारागीर यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येऊन योग्य ती कार्यवाही होऊन न्याय मिळावा ही मागणी निवेदनात केली आहे. या प्रसंगी पारोळा सराफ आणि सुवर्णकार असो चे पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.

Protected Content