जळगाव प्रतिनिधी । कोरोना लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने परराज्यातील व जिल्ह्यातील गरीब मजूर आपल्या परिसरासह मुळगावी राष्ट्रीय महामार्गावरून पायीपायी प्रवास निघाले आहेत. अशा गरजूंना दिलासा म्हणून धर्मरथ फाऊंडेशनतर्फे गंधर्व कॉलनीजवळ थंडपाण्याची व्यवस्था केली. या संस्थेचे समाजातून विविध स्तरातून कौतूक होत आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आसल्याने देशात १७ मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे परप्रांतीयावर कामे रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच रेल्वे व बस सेवा बंद असल्याने महामार्गाद्वारेच परिवारासह मुळगावाकडे पायी निघाले आहेत. बरेच लोक महामार्गावरून आपल्या परिवारासोबत डोक्यावर जड ओझे घेऊन निघाले आहेत. अनेकांनी शेकडो किलोमीटर पायी प्रवास करीत आपल्या मुळगावी जाण्याची ओढ त्यांना लागली आहे. दृष्टिकोनातून धर्मरथ फाउंडेशनतर्फे गंधर्व कॉलनी, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या जवळ त्यांच्यासाठी थंड पाण्याची सोय व त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी अल्पोहाराची सोय करण्यात आलेली आहे. तरी परिसरातून व शहरातुन या स्तूत्य उपक्रमाचे कौतूक होत आहे. धर्मरथ फाउंडेशनचे संस्थपक अध्यक्ष विनायक पाटील, डॉ.शाम तोष्णीवाल, दीपक गुप्ता, प्रवीण पाटील, सोनू सातव आदी परिश्रम घेत आहेत.