कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील जैन पेट्रोल पंपाजवळील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरच्या धडकेत पायी जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, आकाशवाणी चौकाजवळील जैन पेट्रोलपंपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ४० ते ४५ वर्षीय व्यक्ती पायी जात असतांना मगुन भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कंटेनरने जोरदार धडक दिली. यात अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाले. रस्त्यावर जखमी व्यक्ती पडल्याचे पाहून तन्मय चौधरी या तरूणांनी खासगी रिक्षाने तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Protected Content