Home Cities एरंडोल ‘प्लास्टिक बंदी’ संदर्भात एरंडोलमधील ५ व्यापारी व १ बियरबारवर कारवाई

‘प्लास्टिक बंदी’ संदर्भात एरंडोलमधील ५ व्यापारी व १ बियरबारवर कारवाई

0
118

एरंडोल – लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी | एरंडोल नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी विकास नवाळे ‘प्लास्टिक बंदी’ संदर्भात एक्शन मोडमध्ये पहायला मिळाले. या अंतर्गत ५ व्यापारी आणि १ बियर बारवर कारवाई करण्यात आली.

नगरपालिकाचे प्रशासक नवाळे यांनी ‘सिंगल युज प्लास्टिक’ बाबत धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी स्वतः या मोहिमेत सहभाग घेतला. यात ५ व्यापारी आणि १ बियर बारवर कारवाई करण्यात आली असून एकूण ३० हजार रुपये दंड वसूल केला. यामुळे प्लास्टिक बंदीबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

या धडक मोहिमेत नगरपालिकेचे अजित भट्ट, शरद राजपूत, एस. आर. ठाकूर, वैभव पाटील, प्रकाश सूर्यवंशी, तुषार शिंपी, कैलास देशमुख, भरत महाजन, किशोर महाजन हे सहभागी झाले.


Protected Content

Play sound