स्टार्टअप क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रा. भूषण चौधरी यांना पुरस्कार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेतील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व केसीआयआयएलचे संचालक प्रा. भूषण चौधरी यांना भारत सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाकडून स्टार्टअप क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दलचा सन २०२१ चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

हा पुरस्कार केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे दि.३ जुलै रोजी देण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट् राज्य नाविन्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंक कुशवाह यांच्या सह प्रा.भूषण चौधरी यांनी पुरस्कार स्वीकारला.

केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार मंत्रालयामार्फत मान्यता प्राप्त असलेल्या स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. देशातील एकूण ७२ हजार ७०२ मान्यता प्राप्त स्टार्टअप्स पैकी१३ हजार ४५० स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रात सध्या केवळ एक वर्षाच्या कालावधीत केसीआयआयएल तर्फे  २० स्टार्टअप्स सुरु झाले आहेत तर अजुन १५ स्टार्टअप्स सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यापीठातील केसीआयआयएल च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उद्योजकीय कल्पनांना काही प्रमाणात निधी आणि बाजारपेठेसाठीचे योग्य मार्गदर्शन उपलब्ध्‍ करुन दिले जात आहे. प्रा.भूषण चौधरी यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र- कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार, परीक्षा मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल आदींनी अभिनंदन केले आहे.

Protected Content