स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय नाटिका स्पर्धा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ५ वी ते १० वी असा व ११ वी ते पद्युत्तर, खुला अशा दोन गटात स्वातंत्र्य सैनिकांच्या समरगाथाराष्ट्रीय पातळीवरील नाटिका स्पर्धा आयोजली आहे. स्पर्धकांनी आपल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकाच्या जीवनावर आणि वास्तविक घटनेवर आधारित नाटिका सादर करावयाची आहे. त्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंत आपले व्हिडीओ पाठविणे आवश्यक आहे. विजेत्यांना पारितोषिक वितरण १५ ऑगस्टला होईल याबाबत गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कळविण्यात आले आहे.

स्वातंत्र्य हा केवळ शब्द नसून ते जीवन आहे. महात्मा गांधी म्हणतात,”स्वातंत्र्य हा जीवनाचा श्वास आहे”.या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने स्पर्धक ज्या जिल्ह्यातील आहे अशा स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकाच्या जीवनावर आणि वास्तविक घटनेवर आधारित ३ ते ७ मिनिटांची नाटिका सादर असावी. स्पर्धकास त्याच्या सोयीनुसार मराठी, हिंदी आणि इग्रजी भाषेतून नाटिका सादर करता येऊ शकेल.

 

पुरस्कार गट आणि पारितोषिकं –

 

पुरस्कार गट – १ : (इ. ५ ते १० वी)

प्रथम पारितोषिक – १५,०००/

द्वितीय पारितोषिक – ११०००/

तृतीय पारितोषिक – ७०००/

दोन प्रोत्साहन पुरस्कार – ५०००/

 

गट- २ : (इ. ११ वी ते पदव्युत्तर व खुला गट) 

प्रथम पारितोषिक – २१०००/

द्वितीय पारितोषिक – १५०००/

तृतीय पारितोषिक – १००००/

दोन प्रोत्साहन पुरस्कार – ५,०००/

असे पारितोषिके ठेवण्यात आलेले आहेत.

१५ ऑगस्टला स्पर्धेचा निकाल –

नाटिका इडिटींग न केलेला व्हिडिओ पाठवण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे. निवडक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट असेल, गांधी तीर्थच्या सोशल मीडियावर निवडलेल्या व्हिडिओला लाईक प्राप्त करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट आहे. दि.१५ ऑगस्ट २०२२ (७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त गांधीतीर्थ आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात विजेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे.) राष्ट्रीय नाटिका स्पर्धेची संपूर्ण नियमावली खालील वेबसाईटवर, त्याच प्रमाणे स्पर्धेचा  निकाल गांधी रिसर्च फाउंडेशनची वेबसाइट www.gandhifoundation.net वर दि.१५ ऑगस्ट २०२२ नंतर बघू शकतात. असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.

Protected Content