पाथर्डी : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजपने स्वीकारली

अहमदनगर (वृत्तसंस्थ) पाथर्डी तालुक्यातील भरजवाडीच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली आहे. पिडीत कुटुंबाची सांत्वन भेट घेतल्यानंतर दरेकर यांनी स्वतः याबाबतची माहिती पत्रकारांना दिली.

 

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकतीच अहमदनगरमध्ये पाथर्डी तालुक्यातील भरजवाडीच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबातील तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. तसेच भाजपकडून रोख 1 लाख रुपयांची आर्थिक मदतही कुटुंबाला दिली. सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला.

Protected Content