पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील माहेर असलेल्या विवाहिचा ५ लाख रूपयांसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, अंकिता उमेश कचरे (वय-२५) रा. शिवाजी नगर जळगाव यांचा विवाह उमेश प्रमोद कचरे रा. मोहन नगर जळगाव यांच्याशी रितीरिवाजानुसार झाले. लग्नानंतर सुरूवातील चांगले दिवस गेले. त्यानंतर पती उमेश कचरे यांना औरंगाबाद येथे नोकरी लागल्याने पतीपत्नी औरंगाबाद येथे राहू लागले. दरम्यान, उमेश कचरे हे आजारी असल्याने त्यांना मुलबाळ झाले नाही. त्यानंतर उमेश याची नोकरी गेल्याने दोघे जळगावात राहण्यासाठी आले. मुलबाळ होत नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाला. पती उमेश याने मुलबाळ नको आणि संसारही नको असे सांगून घटस्फोटाची मागणी करू लागला. नांदवायचे असल्याचे माहेरहून ५ लाख रूपये घेवून ये अशी धमकी दिली. यासाठी ससरे प्रमोद रामदास कचरे, अशा प्रमोद कचरे, तीन्ही रा. मोहन नगर आणि चित्रा गोपाळ बाऊस्कर रा. मडगाव राज्य गोवा यांना गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता शिवाजी नगर येथे माहेरी निघून गेल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील करीत आहे. 

Protected Content