क्लिन चीट मिळाली की नाही ते सीबीआयनेच सांगावे : मलीक

मुंबई प्रतिनिधी | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लिन चीट मिळाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असतांना आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी या प्रकरणी सीबीआयनेच अधिकृत माहिती द्यावी अशी मागणी केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चीट देण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट सीबीआयला सवाल केला आहे. सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या आज काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत तर सोशल मीडियावर तो अहवाल पीडीएफमध्ये फिरत आहे. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील किंवा खात्यातंर्गत आहे की बनावट करुन तो वायरल करण्यात आला आहे याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे, असं मलिक यांनी सांगितलं.

या देशात खोट्या बातम्यांचा व्हायरसारखा फैलाव होतोय. शासनकर्ते सगळी सत्य माहिती देत नाहीत. ती मीडियाने शोधून काढली पाहिजे. ही मीडियाची जबाबदारी असल्याचे देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Protected Content