ओझरखेडा धरणात सोडण्याचा प्रश्न मार्गी; नाथाभाऊ आणि रोहिणी खडसेंचे मानले आभार

मुक्ताईनगर प्रतिनिधी । ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेवून उपसा सिंचन योजनांची बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याने हरताळा येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे आभार मानले. 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या मागणीनुसार 20 ऑगस्ट रोजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत तळवेल उपसा सिंचन योजनेचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. त्याद्वारे हतनुरचे पाणी ओझरखेडा धरणात टाकण्यात येते.दोन वर्षांपूर्वी या योजनेद्वारे हतनूर चे पाणी ओझरखेडा धरणात टाकण्यात आले होते. परंतु गेले २ वर्षे ही योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद अवस्थेत होती. त्यामुळे योजनेच्या विद्युत पुरवठा व पाणी उपसा करणारे  पंपा मध्ये बिघाड निर्माण झाला आहे असे बैठकीत निदर्शनास आले होते. 

जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी तापी महामंडळ चे कार्यकारी अभियंता वाय एम कडलग यांना तत्काळ आठ दिवसात सर्व तांत्रिक बाबी दुर करून योजना कार्यान्वित करून लवकरात लवकर ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तळवेल उपसा सिंचन योजनेची तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून 27 ऑगस्ट रोजी ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. बाकी असलेला तांत्रिक बिघाड दोन दिवसात दूर करून येत्या 2 सप्टेंबर रोजी माजी पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसा रोजी जलपूजन करण्यात येऊन ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येणार आहे. 

माजी मंत्री एकनाथराव खडसे,जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांच्या प्रयत्नाने ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचा विषय मार्गी लागल्याबद्दल हरताळा ग्रामस्थांनी व लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी एकनाथराव खडसे व रोहिणी ताई खडसे खेवलकर यांचे आभार मानले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे त्यांच्यासह हरताळा सरपंच दिपक कोळी, बाळू भागवत पाटील, अशोक हरी चौधरी,उपसरपंच नामदेव भड, माजी सरपंच समाधान कार्ले, के एन पाटील, किसन चव्हाण, गोपाळ उदळकर, राजेंद्र खराटे, पांडुरंग शेळके, दिलीप तायडे, शंकर चिखलकर,रहेमान शेठ, नामदेव घोपे, पांडुरंग शेळके, दिलीप तायडे, राजू खराटे, कल्पेश चौधरी, उमेश पाटील, महेश शेळके, वसीम शब्बीर सय्यद, अब्दुल्ला मुल्लाजी, शे. जहुर शे. शकुर,दिलीप दांडगे, नामदेव दांडगे,निलेश कार्ले, सुभाष ठाकूर, मोहसीन खान शब्बीर खान उपस्थित होते.

यावेळी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे नॅशनल हायवेच्या कामात नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर जलसंपदा विभागाला देण्यात यावी अशी न्हाई चेप्रकल्प संचालक सिन्हा यांचे सोबत चर्चा केली त्यावर सिन्हा यांनी लवकरच जलसंपदा विभागाला निधी हस्तांतरित करण्यात येईल असे सांगितले

Protected Content