पाचोऱ्यातील लसीकरण केंद्र बंदच : नागरिकांमध्ये असंतोष (व्हिडिओ )

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यासह शहरात ग्रामीण रुग्णालयातर्फे लसीकरणास सुरुवात झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील पंचायत समिती सभापती निवासस्थानाजवळ लसीकरण केंद्र बंद असल्याने नागरिकांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. 

 

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी विविध माध्यमाद्वारे आवाहन करण्यात येत असतांना पाचोरा शहरतील पंचायत समिती सभापती निवास्थानाजवळ असलेले लसीकरण केंद्र काही दिवसापासून बंद आहे. यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या केंद्रावर लसीकरण बंद असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.  डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक लसीकरण करून घेण्यास तयार असून लसीकरण केंद्र रात्री सुद्धा सुरु ठेवावे अशी मागणी वाढत आहे. मात्र हे लसीकरण केंद्रच बंद असल्याने काय करावे ? असा मोठा प्रश्न त्यांत्यांनी उपस्थित केला आहे.  जेष्ठ नागरिक, महिला, व १८ वर्षांपुढील युवक रोज यांना सर्व कामधंदे सोडुन लसीकरण केंद्र उघडण्याची वाट पाहावी लागते. यानंतर केंद्र उघड नसल्याने नागरिकांना लस न घेताच निराश होऊन घरी परतावे लागत असल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.  तरी लसीकरण केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/181519393928376

Protected Content