कोरोना: चिंचोलीत खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथील काही तरूण कोरोना संशयित रूग्णाच्या संपर्कात आल्याची खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील चिंचोली गावातील १३ ते १५ तरूण कोरोना संशयित रूग्णांच्या संपर्कात असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने अंगणवाडी सेविका आणि आशासेविका यांना सांगितले. तसी नावाची लिस्ट देखील अंगणवाडी सेविका यांच्याकडे सोपविली होती. त्यानुसार अंगणवाडी सेविका यांनी रितसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात येवून माहिती दिली. यादीनुसार पोलीसांनी संबंधित तरूणांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सुचना दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित सर्व तरूण हजर झाले असता ‘आम्ही संशयित कोरोना रूग्णाच्या संपर्कात कधीही आलो नाही, आमच्या विषयी खोटी माहिती पसरविण्यात आली आहे’. दरम्यान गैरप्रकार मार्गाने अफवा व खोटी माहिती पसरविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी चिंचोली येथील तरूणांनी केली आहे.

Protected Content