आमदार निधीतून मिळालेल्या विविध विकास कामांचे आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पारोळा प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी पारोळा नगरपरिषदेसाठी वैशिष्टपूर्ण योजनेंतर्गत  ४ कोटी मंजूर झाले आहेत. या कामांचा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. 

 

आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी वैशिष्टपूर्ण कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन प्रसंगी  पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, मा.नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील सर, शहरप्रमुख अशोक मराठे, उपशहरप्रमुख भुषण भोई, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन,  जिजाबरावबापु पाटील, डाॕ.पी. के. पाटील, शेतकी संघाचे संचालक राजेंद्र पाटील, सुधाकर पाटील, शेतकीय संघाचे भिकन महाजन, चेतन पाटील, नगरसेवक मंगेश तांबे, निंबा चौधरी, प्रकाश महाजन, सिध्दार्थ जावळे, पंकज मराठे, राजु पाटील, छोटु चौधरी, पी. आर. वाणी, संजय गोसावी, लखन वाणी, कल्पेश मराठे, मयुर मराठे, पी, आर.पाटील आदी.मान्यवर उपस्थित होते. या कामांचे भूमिपूजन  करण्यात आले.

आमदार निधीतून होणारी कामे :

पारोळा शहरातील बडा मोहल्ला भागातील श्री.मिश्किन शहा दर्गा ते श्री.अशोक मराठे यांच्या पण टपरी पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. – १२.०० लक्ष.  पारोळा शहरातील श्री.सलीम बादशाह यांचे घरापासून ते श्री.जानकीराम शिंपी यांचे घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.(प्रभाग – ३) – १२.०० लक्ष. पारोळा शहरातील प्रभाग क्र- ८ मधील मडके मारोती चौक पासून ते गोंधळवाड्यातील मशिदीपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे. – १२.०० लक्ष. पारोळा शहरातील प्रभाग क्र.८ मधील जुलूमपुरा भागातील श्री.साईबाबा मंदिर जवळील गोलाकार रस्त्याचे गटारीसह सिमेंट काँक्रीटीकरण करणे. – १२.०० लक्ष. पारोळा शहरातील प्रभाग क्र. ८ मधील जुलूमपुरा भागातील पुरुष व स्त्रियांच्या सार्वजनिक शौचालयापासून ते बस स्टँण्ड कडे जाणारी गटार भूमीतगत पद्धतीने बांधकाम करणे. – १०.०० लक्ष. पारोळा शहरातील मडक्या मारोती चौक ते मोठा महादेव चौक पर्यंत रस्ता खोदकाम करून काँक्रीटीकरण करणे. (प्रभाग – ८) – १५.०० लक्ष.  पारोळा शहरातील मडक्या मारोती चौक ते पीर दरवाजा पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे. – १५.०० लक्ष.

Protected Content