धरणगावात सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध; जनजागृती बैठक

dhrangaon pura

धरणगाव प्रतिनिधी । देशात लागू केलेला हुकूमशाही कायदा सीएए आणि एनआरसीच्या बाबत धरणगाव येथील भडंगपुरा भागात जनजागृती करण्यात आली. या कायद्याची अंमलबजावणी करून देशात अराजकता पसरविण्याचे काम विद्यमान सरकार करत आहे, असा सूर मान्यवरांचा बोलण्यातून व्यक्त झाला.

हा कायदा ओबीसी, एससी, एसटी, एनटी आणि अल्पसंख्यांक यांच्या विरोधात असून बहुजन समाजातील लोकांनी वेळीच जागृत होणे गरजेचं आहे, असे प्रतिपादन वक्त्यांनी केले. लवकरच धरणगांव तहसिल कार्यालय परीसरात धरणे आंदोलन करण्याचा संदर्भात ह्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.

बैठकीस यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष करीम सालार, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब वाघ, रेहमान शाह, अहमद पठाण नगरसेवक, फारूक शेख, माजी नगरसेवक राजू शेख, हाजी इब्राहिम, हसन रजा मोमीन, मेहबूब पठाण, हाजी हाफिज मोमीन खालीक मोमीन, तौसीब पटेल, सद्दाम अली, नगर मोमीन, कालू उस्ताद, हाजी इरफान, निसार पहेलवान, आरिफ भाई आदी मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नईम काझी यांनी केले.

Protected Content