चोपडा येथे प्रेरणा दर्पण फाउंडेशनतर्फे पुरस्कार वितरणाचे आयोजन

Gulshan govar

चोपडा प्रतिनिधी । येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील महनीय 25 व्यक्तींना दर्पण पुरस्कार 2020 दिला जात असतो यावर्षी हिंदी चित्रपट सृष्टीतील सिनेअभिनेता गुलशन ग्रोवर यांच्याहस्ते 22 जानेवारी रोजी आनंदराज लॉन्स येथे पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी असणार आहेत. प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेती, प्रशासकीय अश्या विविध क्षेत्रातील पंचवीस महनीय व्यक्तींना दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

यात धनंजय रायसिंग भादले ( सत्रासेन ), डॉ.आनंद राजाराम पाटील (चोपडा), सुदाम शिवराम महाजन (दोंडाईचा) ,अतुल वसंतराव पाटील (यावल) ,अविनाश विष्णू गांगोडे चोपडा बळवंत पंडित नेरपगार वेळोदे राहुल रमेश सोनवणे मुंबई गुमान काशीराम पावरा (पूणे) ,सौ आशा दीपक पाटील सौ नूतन दिलीप पाटील (चोपडा), राहुल पाटील (जळगाव), एम.बी.पाटील ( नाशिक ) पारस आनंदराज टाटीया (जळगाव ), विजय शिवाजी पाटील (एरंडोल), गोरक्षनाथ सपकाळे (सावदा), राजेंद्र आधार वाडे (चोपडा), सचिन बळवंत नेरपगारे (फिनलैंड), हुसेनखॉं अयुबखॉं पठाण (चोपडा ), संदेश अशोक क्षीरसागर (चोपडा) ,शांताराम पितांबर लाड (सेंधवा ),प्रमोद रमेश बाविस्कर (चोपडा), पंकज छगन पाटील (चोपडा), दिलीप बनवारीलाल अग्रवाल ( धुळे ), सुवालाल दगडूलाल जैन बबनशेठ (शिरपूर), सौ मीनाक्षी अजय कुमार जैन (शिरपूर), विजय गोकुळ दीक्षित (चोपडा ), आदी व्यक्तींना दर्पण पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात येणार आहे. तर रतनलाल सी बाफना (जळगाव) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. सुरेश पाटील, आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, नगराध्यक्षा मनीषा चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातुन उपस्थितिचे आवाहन प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष शामकांत जाधव, सचिव लतिष जैन उपाध्यक्ष डॉक्टर निर्मल टाटिया यांनी केलेले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सभासद संजय बारी, हिरेंद्र साळी, चेतन टाटिया ,आकाश जैन, विश्वास वाडे ,सौ लता जाधव, निलेश जाधव, अतुल पाटील ,सौ संध्या शहा ऍड.अशोक जैन आदी प्रयत्न करणार आहेत.

Protected Content