पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत पाचोरा तालुका व भडगाव तालुक्यातील नूतन युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले.
यासाठी पाचोरा येथे शासकीय विश्रामगृहात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन देवेंद्र मराठे यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते अॅड. अविनाश भालेराव, मा. नगरसेवक नंदकुमार सोनार, मा. उपनगराध्यक्ष मुक्तार शहा, शहर काँग्रेस अध्यक्ष अमजद पठाण, तालुका काँग्रेस सरचिटणीस प्रताप पाटील, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष शेख शकील शेख इब्राहिम हे उपस्थित होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष शेख शकील शेख इब्राहिम यांनी नूतन पदाधिकारी यांची निवड घोषित केली यामध्ये पाचोरा तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी रऊफ रशीद काकर, पाचोरा शहराध्यक्षपदी भरत बडगुजर, उपाध्यक्षपदी कपिल पाटील, प्रशांत मालखेडे, भडगाव शहर युवक अध्यक्षपदी अॅड. मोहसीन नूर मोहम्मद खान, उपाध्यक्षपदी शेख साजिद गुलामगोस, पाचोरा तालुका मीडिया सेल अध्यक्षपदी अविनाश रवींद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली. सदर पदाधिकाऱ्यांना बैठक घेऊन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी देवेंद्र मराठे, अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन युवक अध्यक्ष शेख शकील शेख इब्राहिम यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.