यावल येथे काँग्रेसचे निदर्शने व आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अदानी यांच्या उद्योग समुहातील गोंधळलेल्या अर्थकारणाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने स्टेट बँकेसमोर निदर्शने व आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात.

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार जळगाव जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली यावल तालुका व शहर कॉग्रेस कमिटीतर्फे बुधवार ०८ फेब्रुवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखा सातोद रोड, यावल येथे सकाळी ११ वाजता गौतम अदानी यांच्या उद्योग समुहातील गैर कारभाराची केद्रातील नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तातडीने चौकशी करावी या मागणी साठी तालुका व शहर कॉग्रेस कमिटी तर्फ आंदोलन करण्यात आलेत.

याप्रसंगी नेतृत्व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, गट नेते शेखर पाटील, नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक समिर मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, शहर कॉग्रेसचे अध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल, अमर कोळी यांच्यासह महिला कॉग्रेस पदाधिकारी चंद्रकलाताई इंगळे, आदीवासी विभागाचे बशीर तडवी , नईम शेख , राहुल गजरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content